जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : गुरुवार (दिनांक ११ नोव्हेंबर) रोजी शिवाजीनगर राजवाडा येथे बौद्ध विहाराच्या फलकाचे अनावरण शिवसेनेचे आणि जळगाव गाडी लोहार समाज मंडळ व शिववंदन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले करण्यात आले
याप्रसंगी शंकर भोसले,विजय बांदल विभागप्रमुख,शंभू भोसले,गणेश अंभोरे,महेंद्र परदेशी,आकाश अंभोरे,प्रवीण पगारे,प्रसाद शुक्ल,गोविंदा अंभोरे,चेतन दलाल,लोकेश अंभोरे, सोनू अंभोरे,रफिक शेख,मोहसीन शेख,नाना धनगर,शमशुद्दीन शेख,आयुब भाई व राजवाड्यातील जेष्ठ नागरिक व महिलांसह आबालवृद्ध उपस्थित होते.
यावेळी राजवाडा मित्र मंडळाचे संस्थापक स्वर्गीय दिलीप आबाजी भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाविस्कर यांनी केले.






