ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : गुरुवार (दिनांक ११ नोव्हेंबर) रोजी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने ठाणे येथील खोपट एसटी डेपो मध्ये गेल्या आठ दिवसापासून चाललेल्या संपामध्ये सहभागी होऊन त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी आंदोलनात भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रितीताई विक्टर, ॲड. सुरेशजी कोलते भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी कायदेशीर सल्लागार अर्पित माथुर, कामगार आघाडी ठाणे प्रभारी, महेश मोरे कामगार आघाडी रायगड प्रभारी, ॲड. सुनील तिवारी कामगार आघाडी पेन विभाग प्रभारी, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष.प्रशांत तळवडेकर, उपाध्यक्ष- जॉनी जॉर्ज, रमेश यादव, सरचिटणीस प्रशांत पवार, सरचिटणीस सतीश बनसोडे, चिटणीस सौ. मंगला कैचे, सचिन जी सावंत, मंडळ अध्यक्ष कन्हैयालाल विश्वकर्मा,मंडळ अध्यक्ष सुनील यादव इत्यादींच्या उपस्थितीत मान्यवरांनी संपातील आंदोलन करत त्यांना संबोधित करून जाहीर पाठिंबा दर्शविला आणि आघाडी सरकारचा जाहीर निषेध देखील व्यक्त केला एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये विलीन करा असा एकच नारा भारतीय जनता पार्टीने दिला.







