अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.

 

 

अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. हृषिकेश यांनी शुक्रवारी ईडीपुढे चौकशीस हजर राहणे टाळले. अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले आणि १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आले. तसेच आपल्याबाबत होईल, अशी भीती जामीन अर्जात व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here