नाशिकमध्ये तिडके कॉलनी भागात घरफोडी

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील तिडके कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला.

त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदराव बाबुराव भोसले (रा.रॉयल अपा.कुटे मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. भोसले कुटूंबिय बुधवारी (दि.१०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ५ हजार ४०० रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४९ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here