कोल्हापुर (नियाज जमादार) – लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ करण्यात यावे व एप्रिल पासून लागू केलेली विजदरवाढ मागे घेण्यात यावी या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री मा. बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. कोल्हापूर शहर व कोल्हापूरजिल्ह्याच्या जानतेचा पालकमंत्र्याना आवाहन, आपण वाढीव वीजबिल भरू नका’, ‘लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे’ या आशयाचे फलक आंदोलनात झळकत होते.
‘वीज बिल माफ करा, अन्यथा खुर्ची खाली करा’, ‘वीज दरवाढ मागे घेतलीच पाहिजे’, ‘अवाजवी दरवाढ करणाऱ्या वीज कंपन्यांचा धिक्कार असो’, ‘नागरिकांची आर्थिक कुचंबणा करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो’ ,’२०० यूनिट विजबिल माफ झालेच पाहिजे’ अशा घोषणांनी आसंमत दणाणून सोडले.
लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने लॉकडाउन काळातील प्रतिमहिना 200 युनिट वीजबिल माफ व्हावे या मागणीला पाठिंबा म्हणून नागरिकांनी जवळपास ५००० मिस्कॉल केले होते परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतली गेलेली नाही. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे समोर दिसत असताना देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणताही दिलासा दिला जात नाही आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्याना सद्यपरिस्थितीची जाणीव करून ही मागणी मान्य करण्यास भाग पाडले पाहिजे. जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही व वरील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी बिले भरू नयेत असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्या – लॉकडाउन काळातील प्रति महिना 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे, विजबिलांची स्लॅब दरवाढ रद्द झालीच पाहिजे., वीजबिलातील वाढीव वहन आकार रद्द झालाच पाहिजे, लॉकडाउन काळातील वीजबिल ज्या ग्राहकांनी भरले आहे त्यांच्या बिलांच्या रक्कमेतील फरक पुढील बिलातून वजा केला पाहिजे.
या मागण्यांची पूर्तता पुढील एका आठवड्यात करून राज्य शासनाने सामान्य नागरिकांना व वीज ग्राहकांना दिलासा देऊन त्यांची आर्थिक कुचंबणा थांबवावी. अन्यथा, आम आदमी पार्टीला हे आंदोलन नाईलाजासत्व तीव्र करावे लागेल याची नोंद घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टी, कोल्हापूर, संदिप देसाई, पश्चिम महाराष्ट्र संयोजक, निलेश रेडेकर, कोल्हापुर जिल्हा संयोजक, कृष्णा काणेकर कोल्हापुर जिल्हा सहसंयोजक, जे.एम. पोवार कोल्हापुर जिल्हा सचिव, शरद पाटील खजानिस, डॉ.सुरेश सु.पाटील कोल्हापुर जिल्हा मिडीया प्रमुख, भिकाजी काबंळे जिल्हा कमेटी सदस्य, प्रकाश सुतार.इंचलकरंजी शहर संयोजक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, महीला आघाडी, युवा आघाडी, आम आदमी पार्टी मीडिया संघ सहभागी झाले होते.







