शहादा (विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला यावेळी
मार्गदर्शन करतांना आमश्या पाडवी म्हणाले की आज आदिवासी समाजाच्या गौरव दिन असून मात्र कोरोना महामारी मुळे नाईलाजास्तव शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे आदिवासी गौरव दिवस साजरा करावा लागत आहे माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे विना कामानिमित्ताने बाहेर फिरू नये तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक माणसाने एक एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे जे समाजाच्या हितासाठी कायमस्वरूपी कामात येईल असेच समाजोपयोगी मार्गदर्शन यावेळी केले.
अक्कलकुवा येथे आदिवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष आमश्या पाडवी यांनी कोरोना महामारी मुळे साध्या पद्धतीने आदिवासी जागतिक दिवस साजरा केला यावेळी महासंघाचे जि.डी पाडवी, सरपंच राजेश्वरी वळवी.पृथ्वी दादा पाडवी,आदिवासी विद्यार्थी महासंघाचे तालुका अध्यक्ष तुषार पाडवी शहराध्यक्ष राजू पाडवी, प.स.सदस्य,जेका पाडवी,किसन महाराज. विनोद वळवी,तुकाराम वळवी,वन सिंग पाडवी, अमरसिंग वळवी. ईश्वर तडवी, शांताराम पाडवी,रामसिंग वळवी, ताप सिंग वसावे,सुरेश तडवी,छोटू पाडवी,नानसिंग तडवी,कुवरसिंग पाडवी,काना नाईक,हिरालाल महाराज,सरदार सिंग पाडवी, रायसिंग वळवी,विक्रम वळवी, भिमसिंग वळवी,इंद्रसिंग पाडवी, भाऊ राणा,रवींद्र चौधरी,गोलू चंदेल,रोहित चौधरी,जयप्रकाश परदेसी,आदिवासी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता व एकलव्य यांच्या प्रतिमांची पूजन करून आदिवासी...







