मुंबई (गणेश तळेकर) – मी नक्की कोण? एक मुंबईकर की कोकणकर ?असे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येत असतील की नाही मला माहिती नाही पण माझ्या तरी मनात येतो हा प्रश्न तो सुद्धा मार्च महिन्यापासून यायला लागला आहे.मुंबई नक्की महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राबाहेर की कोकण महाराष्ट्र मध्ये येत नाही नक्की काय?
काल परवा शासनाने निर्देश दिले की, एस.टी.ने मुंबईकर कोकणात जाऊ शकतात त्यासाठी सुमारे जवळजवळ ३,००० एस.टी. शासनाने सोडल्या आहेत त्या सुद्धा विनापरवाना…क्या बात है।। आणि खासगी गाडीने जाणारे असतील त्यांनी ई पास गरजेचा आहे तो नसेल तर प्रवेश नाही.वा रे वा; गेल्या ५-६ महिन्यांत एस.टी. महामंडळाचे जे नुकसान झालं आहे ते भरून काढायची पद्धत खूप छान आहे.
एस.टी.ने प्रवास केला तर कोरोना होत नाही का? आणि खासगी गाडीने प्रवास केला की कोरोना होतो का?जाणूनबुजून मुंबई मधील कोकणातील जनतेला त्रास देण्याचं काम चालू आहे, ईपास मिळवून देण्यासाठी एजंट अवाच्यासव्वा करायला पैसे घेत आहेत जणू काय ह्यांचे सगे सोयरे पास काढायला बसले आहेत.पुन्हा एकदा राज्य शासनाने यावर विचार विनिमय करावा आणि मुंबई मधून कोकणात जाणाऱ्या सर्व जनतेला एकसमान न्याय द्यावा तसेच कोकणात येताना प्रत्येक मुंबईकर डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट घेऊनच येत आहे तरी सुद्धा पास रिजेक्ट होत आहे. मात्र एजंटकडून १ ते २ तासात पास ॲप्रुव्ह करुन मिळतो, हा कुठचा न्याय.यावर शासनाने विचार करुन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी लोकस्वराज्य फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या माध्यमातून परिवहन मंत्री ना.अनिल परब यांना करण्यात आली आहे.







