किरण गोसावीची महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. फसवणूक प्रकरणातील गोसावीची आणखी एक महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला लष्कर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आज तिला कोर्टात हजर केले असता तिला १५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. तिच्याकडून साडे सहा लाख रुपये लष्कर पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत एक लाख तीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला शुक्रवारी अटक झाली होती. कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी अटक केली.

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here