अहमदपुर (प्रतिनिधी अजय भालेराव) : येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती ( १४ नोव्हेंबर) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे माजी सभापती ॲड. टि.एन.कांबळे तर व्यासपीठावर जेष्ठ विधिज्ञ ॲड.आर एस. वाघमारे, दलित मित्र उत्तमराव माने,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोकराव चापटे,साहित्यिक एन.डी.राठोड, शिवाजीराव जंगापल्ले,ग्यानोबा घोसे, बी एम.जंगापल्ले,प्रा.दिलीप भालेराव,सुनिल डावरे,आशिष तोगरे, प्रकाश भालेराव, बळीराम सुर्यवंशी, विनोद नामपल्ले,प्रा.दिपक बेले,प्रकाश ससाणे, अशोक सोनकांबळे,प्रदीप मुन्ना कांबळे,ज्ञानोबा मडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.टि.एन.कांबळे,ॲड. आर.एस.वाघमारे, उत्तमराव माने, अशोकराव चापटे, एन.डी.राठोड आदींनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन लसाकमचे जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लसाकमचे कार्याध्यक्ष विश्वांभर जिवारे, महेश वाघमारे,प्रकाश(बापू) कांबळे,स्वप्नील मेकाले आदींनी परीश्रम घेतले.






