अकोला जिल्ह्यातही वातावरण चिघळले, अकोट शहरात संचारबंदी लागू

akot-sancharbandi

अकोला (प्रतिनिधी) : जिल्ह्यातही वातावरण चिघळले असून अकोट शहरात संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री चार भंगाराच्या दुकानांना आग लावण्यात आल्याने पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या वतीने तहसीलदार निलेश मडके यांनी १७ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत संचारबंदीत वाढ करण्याचा आदेश दिला आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सोमवारी अकोट शहराची पाहणी केली. सध्या शहरात तगडा पोलिस बंदोबस्त आहे. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत अकोट येथे असून स्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

अकोट शहरामध्ये दुकानांना आग लावल्याची घटना घडल्याचे कळल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी आज अकोटची पाहणी केली. कानुन व्यवस्था स्थितीची त्यांनी माहिती घेतली. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. मीणा यांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here