माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी, कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सचिन वाझेलादेखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, आता त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले ह…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here