कुलू (हिमाचल प्रदेश) : नेत्यांची म्हैस, कुत्रा, मांजर हरवले तर पोलिसांना त्यांच्या शोधासाठी लावणे काही नवे नाही. पण आएपीएस अधिकाऱ्याने एका पेनासाठी मुख्यालयातील सगळ्या पोलिसांना कामाला लावण्याचा प्रकार येथे घडला आहे. दरम्यान या शोधाशोधीत पेन काही सापडले नाही परंतु हा चर्चेचा विषय झाला आहे. हरवलेल्या पेनाची किंमत काही हजारांत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा मुख्यालय कुलूमध्ये एक महिला आयपीएस अधिकारी पोलीस भरती करण्यासाठी आली होती. तेव्हा तिचे महागडे पेन हरवले. ते शोधण्यासाठी तिने मुख्यालयातील सगळ्या पोलिसांना कामाला लावले. रविवारी सायंकाळी ती ढालपूरच्या हॉस्पिटलशेजारील काही दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आली होती. याच वेळी तिचे पेन कुठेतरी हरवले. तिने पेन शोधायचा प्रयत्न केला परंतु मिळाले नाही. यामुळे सोमवारी दुपारनंतर पोलिस अधिकारीच या दुकानांमध्ये पोहोचले. त्यांनी पेनाविषयी चौकशी केली.






