नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : बंगलोर – मुंबई हा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याकडून आलेला नवले पुलापर्यंतचा रस्ता हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. या ठिकाणी सातत्याने प्राणघातक अपघात घडत असतात.

मंगळवारी सकाळी नवले पुलाच्या जवळ एका कंटेनरला भीषण अपघात झाला. सुदैवाने यावेळी बाजूला वाहने नसल्याने जीवित हानी झाली नाही. या अपघातात कंटेनरचा चालक मात्र जखमी झाला आहे. सकाळी ९ वाजता ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातार्‍याकडून एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुल संपल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनरचा ट्रेलर त्याच्या केबिनवर आदळला़ व तो दुभाजकावर आला. या घटनेत त्यात केबिनचा चक्काचुर झाला. पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून कंटेनर बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here