शिर्डी लायन्स क्लबचे उल्लेखनीय कार्य

शिर्डी (प्रतिनिधी) : लायन्स क्लब इंटरनॅशनल या जागतिक सेवाभावी संस्थेची शिर्डी येथील शाखा लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई गेल्या ८ वर्षापासून शिर्डी पंचक्रोशीत कार्यरत आहे. क्लब तर्फे विवीध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात.

या ही वर्षी चिपळूण पूरग्रस्तांना मदत, अनाथ मुलांना अन्नदान, नेत्र व रक्त तपासणी शिबिर, वृक्षारोपण, पर्यावरण पूरक गणेश मुर्ती निर्मिती कार्यशाळा असे अनेक उपक्रम क्लब मार्फत घेण्यात आले. १८ ते ३० वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी लिओ क्लब ऑफ शिर्डी साई ची स्थापना करण्यात आली. क्लब मध्ये सध्या ४० सभासद असुन दरवर्षी नवीन सदस्यांची अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदी नियुक्ती करुन त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाते.समाज कार्य करण्यासोबतच क्लब सदस्यांसाठीही विवीध उपक्रम दरवर्षी राबवले जातात. या उपक्रमा अंतर्गत या वर्षी सर्व क्लब सदस्यांना दिवाळी भेटवस्तु व मिठाई चे वाटप करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष ला. प्रा. सागर कुलकर्णी, सचिव ला. महेश वैद्य व खजिनदार ला. वसंत घुगे यांनी प्रत्येक सदस्याच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तु व मिठाई देऊन दिवाळी च्या शूभेच्छा दिल्या. सर्व सदस्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई मध्ये प्रत्येक सदस्याचा वाढदिवस केक कापून व सत्कार करुन साजरा केला जातो, तसेच विवीध ठिकाणी सहलींचेही आयोजन केले जाते.

या सोबतच कोजागिरी पौर्णिमा, हुरडा पार्टी असे विवीध कार्यक्रम क्लब तर्फे प्रत्येक वर्षी होत असल्यामुळे सदस्यांचा एक स्नेहमेळावाच क्लब मध्ये तयार झाला आहे. अशा उपक्रमा मुळे अनेक नवीन सदस्य लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत व क्लब ची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ D २, रिजन ७, झोन १ चे चेअर पर्सन ला. डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई ची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here