नाशिक (विशेष प्रतिनिधी) : मल्हारखाना झोपडपट्टीमध्ये हळदीच्या कार्यक्रमात मोठ मोठ्याने ढोल व ताशा वाजवणे नवरदेवाला चांगले महागात पडले आहे. वाद्य वाजविण्याची परवानगी न घेतल्यामुळे नवरदेव प्रसाद बुकाने, त्याचे वडील संतोष व वाद्य वाजविणारे अशा सहा जणांविरुध्द सरकारवाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी सांगितले. हळदीच्या कार्यक्रमात वाद्याचा मोठ्याने आवाज आल्याने या ठिकाणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हे अधिकारी व सहकारी झोपडपट्टीत गेले. या ठिकाणी संतोष बुकाने यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरु होता.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी परवानगी घेतली का विचारले. पण, परवानगी घेतली नसल्याचे सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.






