अभिनेत्री कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन

कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : येथील जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक इचलकरंजी कार्यालयात अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेणेबाबत निवेदन देण्यात आले.

आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ,माजी आमदार अशोकराव जांभळे, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन दादा जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष निहाल कलावंत यांच्या आदेशावरून आज इचलकरंजी पोलीस स्टेशन या ठिकाणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेणेबाबत आज इचलकरंजी पोलिस उपअधिक्षक यांना श्री.शिंदे यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले

निवेदन देते वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा संघटक सचिव बाबाजान अपराज, इचलकरंजी शहरअध्यक्ष असिफ शेख, सेवादल अध्यक्ष अमोल भाटले, जावेदभाई मुजावर, रफिक मुल्ला व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here