ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : एम एस एफ तथा पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचे वसई येथे चौथ्या कार्यालयाचे उद्घाटन समितीचे संस्थापक संचालक सिद्धार्थ डी जाधव, धीरज वी पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले वसई कार्यालयाचे उद्घाटन करताना खालीद शेख संघटक पालघर यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. सदर कार्यालयाला उद्घाटन प्रसंगी विशेष उपस्थिती कैलास बर्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे , राहुल पाटील पोलीस निरीक्षक यांनी उपस्थिती देऊन खालिद शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
हा उद्घाटन सोहळा पार पाडताना गेल्या दोन वर्षापासून कोरोना कालखंडामध्ये अनेक गोरगरिबांना मदत करणाऱ्या समाजसेवक व संस्थेचे पदाधिकारी यांना कोरोणा योद्धा गौरव २०२१ ने सन्मानित करण्यात आले तसेच समितीचे कार्य कशा प्रकारे चालते या बाबतची माहिती समितीचे संस्थापक सिद्धार्थ डी जाधव यांनी मार्गदर्शन केले पोलिस गृहरक्षक संघर्ष समितीचे महाराष्ट्र भर १० कार्यालय आहेत अशा प्रकारे गाव तिथे शाखा याप्रमाणे तरुणांना समिती मध्ये समाविष्ट करून पोलिसांच्या न्याय हक्कासाठी तरुणांची फौज उभी करण्याचे काम समिती मार्फत करण्यात येणार आहे सदर मार्गदर्शन करताना समिती फक्त पोलीस व होमगार्ड ,समाजातील वंचित गोर गरीब मुलं आणि पीडित महिला यांच्यासाठी नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहील याबाबतचे आश्वासन सिद्धार्थ जाधव यांनी दिले
श्री जाधव यांनी असेसुद्धा उद्गार काढले की पोलीस आणि होमगार्ड यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे ते शासन दरबारी जास्तीत जास्त सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाईल या बाबतची सूचना संबंधित जिल्हाध्यक्षांना आदेशित केले तसेच या समितीमध्ये जास्तीत जास्त तरुण वर्ग सहभागी होऊन पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे तसेच पोलिसांचे जीवन सुद्धा हलाखीचे आहे त्यांना ड्युटी वरती राहावे लागते ते सुद्धा आपल्या कुटुंबापासून दूर तरी सर्व पुरुष महिला यांनी यांच्यासोबत राहून त्यांना हातभार लावावा या बाबतच्या सूचना सुद्धा समितीमार्फत देण्यात आल्या
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री अमोल माने प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सौ निशा फाटक महिला अत्याचार अध्यक्षा महाराष्ट्र राज्य, अमोल पटेकर युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, किरण उसनकर पालघर जिल्हा अध्यक्ष , सौ प्रीती खानेकर ठाणे जिल्हा वाहतूक अध्यक्षा, सौ कल्याणी भांगरे सल्लागार ठाणे, सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष, यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली







