बागेत फिरणार्‍या तेलगू अभिनेत्रीवर हल्ला

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : तेलगू अभिनेत्री शालू चौरसीयावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये शालूचा मोबाईल चोरी करण्यात आला असून तिला मारहाण देखील करण्यात आली आहे. ही अभिनेत्री जखमी असल्याचं समोर आलं आहे.

रविवारी रात्री सुमारे साडेआठ वाजता शालू चौरसिया टोनी बंजारा हिल्सच्या KBR पार्कमध्ये चालत होती. यावेळी तिचा फोन हिसकावून घेण्यात आला. या प्रकरणाबाबत अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली आहे. तसेच आधी अज्ञात व्यक्तीने शालूला तिच्या कढील मौल्यवान वस्तू आणि पैसे त्याच्या हवाली करण्यास सांगितले. मात्र असं करण्यास शालूने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर बुक्का मारून तिला दगडाने वार करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी शालूचा फोन हिसकावून घेऊन फरार झाला. तर झालेल्या हल्ल्यामध्ये अभिनेत्रीच्या डोळे आणि डोक्याच्या मधोमध अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळेच अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर बंजारा हिल्स पोलीस आरोपीला शोधण्यासाठी संबंधित ठिकाणावरील तसेच आसपासच्या जागेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here