दुचाकी न दिल्याने चार जणांनी केली तरूणास बेदम मारहाण

marhan

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : दुचाकी दिली नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना राजीवनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

याप्रकरणी रवी केशव भगत (१९ रा.बडदेनगर,सिडको) या युवकाने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी माधुरी भालेराव,गजानन भालेराव,उमेश भालेराव,सुनिल भालेराव या मारहाण करणाऱ्या संशयीतांना ताब्यात घेत आहे.

भगत सोमवारी (दि.१५) राजीवनगर येथील रूंग्ठा बिल्डरच्या साईटवर गेला होता. यावेळी संशयीतांनी त्याच्याकडे जवळच जायचे आहे असे म्हणून दुचाकीची मागणी केली. मात्र भगत याने आपली मोटारसायकल देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत भगत जखमी झाला असून जमादार हादगे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here