बारामती (प्रतिनिधी) : पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याने आपघातात दुचाकीवरील काळूराम गणपत लोंढे आणि शाकूबाई काळूराम लोंढे हे पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी स्पेलंडर क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती.
यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. आपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले.






