नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : सामन्यांचा आधार असलेली एसटी ही जवळ जवळ महिन्याभरापासून रस्त्यावर दिसत नाहीये, एस. टी. कर्मचारी मात्र रस्त्यावर दिसतो आहे. आजवर सलग ३७ व्या एस. टी. कामगाराने आत्महत्या केली आहे, पण अजूनही एस. टी. विलगीकरणाच्या प्रश्नावर राज्यसरकारकडून कुठलीही सकारात्मक दखल घेतली गेलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर एस. टी. कामगार युनियन हि संपावर गेले आहेत.
आज राहुल गणोरे यांनी एस. टी. कामगाऱ्यांच्या या संपला उपस्थित राहून, कामगारांसोबत संवाद साधला, त्यांच्या समस्या आणखी बारकाईने जाणून घेतल्या, आणि राज्यसरकारने एस. टी. कामगारांच्या या गंभीर समस्यांचे लवकरात लवकर निरसन करावे हि कळकळीची विनंती केली.






