जिल्ह्यातील रमाई घरकूलाचे प्रलंबीत हप्ते तातडीने द्या अन्यथा सम्राट मित्र मंडळाचा आंदोलनाचा इशारा

अहमदपूर (प्रतिनिधी अजय भालेराव) : लातूर जिल्ह्यातील रमाई घरकूल योजनेच्या अनुदानाचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असून अनूसूचीत जातींच्या गोरगरीब लोकांचे स्वतःच्या हक्काच्या घरकूलाचे स्वप्न यंत्रणेच्या दूर्लक्षामूळे पूर्ण होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका,सर्व नगर परिषदा आणी नगरपंचायती क्षेत्रातील प्रलंबीत असलेले अनुदान तातडीने द्यावी अन्यथा तीव्र अंदोलन करण्याचा इशारा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

लातूर येथे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांची भेट घेवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देवून हा ईशारा दिला आहे.या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अनूसूचीत जातींच्या नागरिकांसाठी शासनाची रमाई घरकूल योजना खूप प्रभावी पणे राबविली जात आहे.या योजनेमूळे नागरी भागात मोठ्या प्रमाणात घरकूल साकारण्यास मदत झाली आहे.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रमाई घरकूलाचे अनुदान मंजूर न झाल्याने नागरीकांमधून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे.मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अनुदान येणार या अपेक्षेने बांधकाम सूरू केले मात्र कित्येक महिने होवून सूध्दा अनुदान आले नाही त्यामूळे उसनवारी,व्याजी करून बांधकाम सूरू केले आहे.मात्र लाभार्थ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यामूळे घरकूलांचे तातडीने अनुदान मंजूर करावे,घरकूल निर्माण समितीच्या बैठका नियोजित वेळेत घ्यावे,रमाई घरकूलाचे ग्रामीण व शहरी भागातील उद्दीष्ट वाढवून द्यावे अन्यथा थोडे निदर्शने अंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे.

या निवेदनावर गफारखान पठाण,प्रशांत जाभाडे,जीवनराव गायकवाड,अजय भालेराव,शरद कांबळे,आकाश सांगवीकर,शरद सोनकांबळे,सचिन बानाटे,भिमराव कांबळे,संभाजीराव कांबळे,कैलास भालेराव माणिक वाघमारे,गणेशराव मूंडे,सूनिल कोमले,मतीन शेख,नितीन कांबळे,सुनिल मोरे,नवनाथ भालेराव,विजय भालेराव,मुकुंद वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here