जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.९) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सॅनिटायजेशन केले. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद, श्री.बिराजदार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे किसनभाऊ मेथते आणि शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील आदींचे सहकार्य लाभले.








