तळागाळातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान
कारंजा (तालुका प्रतिनिधी हफिज खान) : येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तसेच तळागाळातील लोकांना न्याय मिळावा यासाठी आपले कार्य आणि लेखणीद्वारे प्रयत्न करणारे वाशीम जिल्ह्यात म्हणून कराटे चॅम्पियनची ओळख निर्माण करणारी पत्रकार तथा कराटे चॅम्पियन सामाजिक कार्यकर्ते मयुरी गुप्ता यांना यंदाचा ज्ञानगंगा साहित्य मंडळ साप्ताहिक कारंजे महात्म परिवाराकडून सेवाव्रती पत्रकार व कराटे चॅम्पियन व सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रकार मयुरी गुप्ता यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले
कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षक आमदार ॲडवोकेट किरण सरनाईक व कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार निलेश सोमाणी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आला पत्रकारिता हे व्रत आहे पत्रकारितेच्या माध्यमातून तथा कराटे प्रशिक्षणार्थी जनसामान्यांच्या प्रश्नाचा वाचा फोडून त्यांना शासन दरबारी मांडून न्याय देण्याची भूमिका जोपासणारी व पत्रकारितेचा वसा घेऊन तथा कराटे चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा या युवतीने कराटे प्रशिक्षण मुलांना देण्यास तात्पर्य राहणार असे मत या युवतीने व्यक्त केले.
पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्य प्रश्नाचा वाचा फोडून शासन दरबारी मांडून न्याय देण्याची भूमिका जोपासणारी व पत्रकारिता व साथ देऊन सामाजिक कार्य करणारी वाशिम जिल्ह्याचे नामांकित युवती व पत्रकार व कराटे चॅम्पियन सामाजिक कार्यकर्ता कुमारी मयुरी महेंद्र गुप्ता यांना ज्ञानगंगा साहित्य मित्र मंडळातर्फे स्मृतिचिन्हशाल श्रीफळ व प्रमाणपत्र सहपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच कारंजातील सर्व पत्रकारांनी त्याचे अभिनंदनाचा वर्षाव केला.







