श्री. गुरु नानक देव जी ह्यांच्या जयंती निमित्त २८ वे रक्तदान केले.

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफिज खान) : सिख धर्मियांचे संस्थापक व प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी ह्यांच्या ५५२ व्या प्रकाश उत्सव निमित्त पुज्य सिंधी समाज ,श्री. गुरुनानक जन्मोत्सव समिती ,अमृतवेला ट्रस्ट व कारंजा लाड रक्तदान चळवळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी कॅम्प येथील श्री. श्री मातेश्वरी नवशक्ती धाम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कारंजा लाड येथील सामाजिक कार्यकर्ते व शांत व प्रसन्न तसेच संयमी व्यक्तिमत्व असलेले अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी तब्बल २८ वे रक्तदान करुन राष्ट्रीयत्वाची प्रेरणा दिली .

संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी केलेल्या २८ व्या रक्तदानानिमित्त आयोजकांनी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं. ह्यावेळी संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here