अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; गोळी लागल्याने बँक व्यवस्थापकाचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेच्या दरोड्याची घटना नुकतीच घडली असतांना, आता जुन्नर तालुक्यात १४ नंबर फाट्यावर दोन दरोडेखोरांनी अनंत ग्रामीण पतसंस्थेवर बुधवारी (दि.२४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला.

दरोडेखोरांनी दोन लाख पंन्नास हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बँकेत बँक व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते. बुधवारी दुपारी पतसंस्थेच्या कार्यालयात दोन दरोडेखोर आले. त्यांनी पिस्तूलाच्या साहाय्याने धमकावण्यास सुरुवात केली. याच दरम्यान व्यवस्थापक दशरथ भोर यांनी दरोडेखोरांना विरोध केला असता दरोडेखोरांनी भोर यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांचा मृत्यू झाला आहे.

नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here