कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक

honey-trap

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : येथील कारखानदार व मसाला व्यापारी अशा आणखी दोन व्यापाऱ्यांनी आपल्याला ‘हनीट्रॅप’ केल्याची पोलिसांत तक्रार दिली. ‘हनीट्रॅप’ टोळीचा म्होरक्या हा सागर माने असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या दोन्हीही ट्रॅपप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सहाजणांना गुरुवारी अटक केली.

कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्याकडून दहा लाखांची मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये व्यापाऱ्याने त्या टोळीला दिले. तर इतर रकमेसाठी फोन करून त्रास देऊ लागल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार महिला सोनाली ऊर्फ प्रतीक्षा पाटील या महिलेस अटक केली. तर सागर माने याच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला.

अशाच पद्धतीने शिरोलीतील एका कारखानदाराला मुलीसोबत सोबत आलेल्या गुंडांनी ‘हनीट्रॅप’ करून कारखानदाराकडून आतापर्यंत वेळेवेळी सुमारे ३८ लाखांची रक्कम उकळली आहे. एका अल्पवयीन मुलीसह विजय कलकुटगी, रोहित साळोखे, विजय मोरे, फारुख खान, गणेश शेवाळे यांना अटक केली. आणखी कुणाला त्यांनी लुटले आहे का याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here