पतीच्या प्रेमसंबंधांना आणि छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : शहरातील पिंपरीतील यमुनानगर, निगडी परिसरात पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध . पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली आहे.याबाबत मृत महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मृत बहिणीचे पती युवराज घारगेच तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत बहिणीच्या पतीचे लग्नांनंतरही बाहेर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधावरुन पती सातत्याने बहिणीचा मानसिक छळ करत तिला मारहाण करायचा. अनेकदा अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत असे. मात्र एक दिवस सर्व काही ठीक होईल या आशेवर बहीण निमूटपणे सर्व काही सहन करत राहिली. अखरे मानसिक ताण सहन न झाल्यानेच तिने घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती भावाने दिली आहे.

महिलेने केलेले आत्महत्येबाबत हळहळ व्यक्त केली जात असताना, विवाहितेच्या भावाने केलेल्या आरोपापाबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पती-पत्नीचे पटत नव्हेत तर पती पासून विभक्त होता आले असते. आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयामुळं स्वतःचंच नुकसान करुन घेतल्याची चर्चाही संबधितांमध्ये सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here