बंद घर फोडुन ऐवज लांबविणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील गणपती नगरातील सुरेश फुड वर्डस जवळ असलेल्या बंद घराचे कुलुप तोडुन घरातुन ऐवज लांबविणाऱ्या दोन जणांना तांबापुर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे.

या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हातील संशयित आरोपी जळगावात असल्याची गोपनीय महिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक फौजदार युनुस शेख पोलिस हे.कॉ राजेश मेढे, संदीप पाटिल, संतोष माइकल, यांनी तांबापुरा भागात पेट्रोलिंग करत असतांना संशयित आरोपी (फरीद उर्फ गुल्ली अहमद मुल्तानी रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव) याला ताब्यात घेतले.

त्याची अधिक चौकशी असता त्याने गणपती नगरातील सुरेश फुर्ड वर्ल्डजवळ असलेल्या बंद घर फोडुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही घरफोडी त्याचा मित्र संशयित आरोपी श्याम सुभाष तानसर ( वय- १९) रा. रामेश्वर कॉलोनी संभाजी नगर यांनी मिळुन घरफोडी केल्याचे संगीतले. घरफोडीच्या गुन्हात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सहायक फौजदार पंढरीनाथ नरवाडे, यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here