सटाणा येथे शेतकऱ्यांचे रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे थकीत विज बिल वसुली सुरू केली असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर असलेले रोहीत्र ( डी ,पी) बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार बागलाण तालुक्यातील अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने , शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे , सध्या कांदा लागवडीचे दीवस असल्याने धड पाच सहा तासही सलग विद्युत पुरवठा होतो नाही.

आठवड्यातून दोन तीन दीवसही ही दिवसा लाइट मिळत नाही , शेतकरी रात्रीचा दीवस करून कंसे तरी पिकं जगवत असताना , महावितरण कंपनीने सक्ती ची विज बिल वसुली सुरू करुन शेतकऱ्यांच्या बांधावरील , तसेच गावातील सर्व विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन , सटाणा शहरातील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या मांडला व जवळ जवळ अर्धा तास आंदोलन करुन वहातुक रोकुन धरली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव , राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार , स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे कार्य अध्यक्ष सुभाष आहीरे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ विलास बच्छाव , शेतकरी मित्र बिंदू शर्मा, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणीक देवरे यांनी , मनोगत व्यक्त करुन सक्तीची विज बिल वसुली व विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध केला ,जो पर्यंत वसुली ची कार्यवाही थांबत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असी आंदोलख शेतकऱ्यांनी भुमिका घेतली असता , तातडीने बागलाण चे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ब्रोंडे यांनी यापुढें कुटल्याही गावातील व शेतकऱ्यांच्या बांधावरील विद्युत पुरवठा तोडला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले.

त्यानंतर आ,दिलीप बोरसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले की , हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून जो पर्यंत आघाडी सरकार सक्तीची विज वसुली थांबवत नाही तोपर्यंत चालुच राहील असे आंदोलक शेतकऱ्यां समोर बोलताना सांगितले , स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे समन्वयक कुबेर जाधव यांनी आंदोलक शेतकऱ्यां समोर बोलताना सांगितले की ” सरकार कोणाचेही असो , शेतकऱ्यांचे मरण हे च सरकार चे धोरण आहे म्हणून आम्ही या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करीत आहोत ,यावेळी शेतकरी संघटनेचे नेते भास्कर सोनवणे , प्रहार शेतकरी संघटनेचे , किरण मोरे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका अध्यक्ष रमेश बापू आहीरे सह भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते सामिल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here