
नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | विठेवाडी गावाचे भूमिपुत्र पोलीस निरीक्षक श्री. भगवंत निंबाजी निकम (नाशिक), भारतीय सैन्य दलातील जवान श्री. वसंत बाबुराव पवार आणि श्री. सचिन बापु आहेर हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या देशसेवेचा गौरव करण्यासाठी विठेवाडी येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र दत्त मंदिर प्रांगणात एका छोटेखानी परंतु अत्यंत सुंदर आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सेवापूर्ती सोहळ्यात विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन कुबेर जाधव यांनी पोलीस निरीक्षक भगवंत निकम यांच्या खात्यातील उल्लेखनीय कार्याचा आवर्जून गौरव केला. तसेच निकम यांनी भविष्यात आपल्या गावासाठी वेळ देऊन, आपल्या अनुभवाच्या माध्यमातून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे देशरक्षणासाठी प्रदीर्घ सेवा बजावणारे जवान वसंत पवार आणि सचिन आहेर यांनीही गावातील नवतरुणांना देशसेवेसाठी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
याच सोहळ्यात नुकतेच भारतीय सैन्य दलात दाखल झालेले गावातील नवतरुण श्री. वेदांत विलास पवार आणि निलेश वाघ यांचाही ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या तिन्ही मान्यवरांना कुबेर जाधव स्वयंलिखित आणि अत्यंत गाजलेले ‘सहकारनामा‘ हे पुस्तक आवर्जून भेट देण्यात आले.
सत्कार सोहळ्यानंतर तिन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत गावकऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन पी. डी. निकम, माजी चेअरमन कुबेर जाधव आणि शशिकांत निकम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व सत्कारमूर्तींचा जाहीर सन्मान केला.
या सोहळ्यासाठी विठेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नानाजी पवार, उपसरपंच ईश्वर निकम, विठोबा निकम, वसंतदाद सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन फुला आप्पा जाधव, सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत निकम, समाधान निकम, मुन्ना निकम, जिभाऊ बोरसे, विलास निकम, राहुल निकम, महेंद्र आहेर, राजेंद्र निकम, तानाजी निकम, बापू सोनवणे, संजय सावळे, तकदीर कापडणीस, रमेश निकम, राजेंद्र सावळे, प्रवीण निकम, काशिनाथ बोरसे, पप्पू बोरसे, भावसा हिरे, दिनकर अहिरे, बंडू आहेर, अरुण निकम, सुभाष निकम, रामदास निकम, निंबाजी निकम, योगेश निकम, मधुकर वाघ, दादाजी सोनवणे, संजय भास्कर निकम, सुभाष पगार उपस्थित होते. तसेच भऊर येथील सोसायटीचे पंडित दौलत पवार, जिभाऊ पवार, दीपक पवार, वैजू पगार, पप्पू कोकरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, विठेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन, प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी चेअरमन श्री. कुबेर जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. शशिकांत निकम यांनी मानले.







