ठाण्यातील माजिवाडा उड्डाणपूलाखाली उभ्या असलेल्या मिनी बसला आग

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथील माजिवाडा उड्डाणपूलाखाली उभ्या असलेल्या भंगारातील एका मिनी बसला (एमएच ४६ ई ८८६) आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

माजिवाडा उड्डाणपूलाखाली आझाद टिंबर ट्रेडर्स माजिवाडा, ठाणे (प.) समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कापूरबावडी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरडीएमसी आणि अग्निशमन दलाचे एक वाहन फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणाला दुखापतही झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here