धाडणे शिवारात दीड लाखांची घरफोडी

gharphodi

धुळे (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील धाडणे शिवारात चोरट्यांनी शेतकर्‍याकडे घरफोडी करून रोख रक्कमेसह दीड लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.२५ रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर ते दि. २६ रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान ही घटना घडली. साक्री ते पिंपळनेर रोड लगत धाडणे शिवारात फाट्याजवळ शेतकरी भास्कर रामदास घरटे (वय ५१) हे राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील खोलीतील पत्राच्या कपाटातील ५० हजारांची रोकड व ५४ हजारांचा १८ ग्रॅमचा सोन्याचा हार, २२ हजार ५०० रूपये किंमतीचा साडेसात ग्रॅमचे सोन्याचे कानातील झुबे, १५ हजारांची पाच ग्रॅमची अंगठी असा एकुण १ लाख ४१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरटे यांनी साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी.बी.नर्‍हे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here