शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दिल्ली हरियाणा सोनीपत येथील राष्ट्रीय स्पर्धेत शिर्डीतील साईनिर्माण करिअर अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी दहा राज्यातून ११ सुवर्ण पदके व २ सिल्वर पदकांची कमाई करत सर्वात जास्त पदके मिळवण्याचा बहुमान प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा कायम ठेवला असून या बहुमोल कामगीरीबद्दल साईनिर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
दिल्ली सोनीपत येथे सुरू असलेल्या युथ गेम फेडरेशन आँफ इंडिया यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत एकूण दहा राज्यातील टीम सहभागी होत्या. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, राज्यस्थान, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ. यापैकी महाराष्ट्रातून तीन टिम सहभागी झाल्या होत्या. शिर्डी येथील साई निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त १३ पैकी ११ सुवर्णपदक व 2 रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यावेळी गोळा फेक स्पर्धेत स्नेहल देवकर हिने (सुवर्ण पदक), ४०० मिटर धावणे स्पर्धेत शुभांगी कापकर (सुवर्ण पदक), १०० मिटर धावणे स्पर्धेत राणी सावंत (सुवर्ण पदक), २०० मिटर धावणे स्पर्धेत वैभवी दणके (सुवर्ण पदक), १०० मिटर धावणे स्पर्धेत विजय थोरात (सुवर्ण पदक), १७ वर्षाखालील ३ किमी धावणे स्पर्धेत ओम रोकडे (सुवर्ण पदक), २० वर्ष वयोगटाखालील ३ किमी धावणे स्पर्धेत साई मार्कंड (सुवर्ण पदक), ८०० मीटर धावणे स्पर्धेत सागर वाकचौरे (सुवर्ण पदक), १० किमी धावणे स्पर्धेत ऋषिकेश काटे (सुवर्ण पदक), गोळा फेक स्पर्धेत सचिन पवार (सुवर्ण पदक), ५७किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेत शिवम पाचोरे (सुवर्ण पदक), ५ किमी धावणे स्पर्धेत वणेश आरणे (रौप्य पदक), २०० मिटर धावणे शुभम जमधडे (रौप्य पदक).
सर्वात जास्त सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल टीमचे कोच प्रमोद कदम यांना गेस्ट ऑफ ऑनर मोमेंटो पुरस्काराने गौरविण्यात आले. ही राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा होती. या स्पर्धेत मिळालेल्या प्रमाणपत्रावर भारतामध्ये आर्मीसाठी स्पोर्ट कोटा आरक्षित आहे. भारतात १२ ठिकाणी आर्मी भरतीसाठी ही मुले पात्र तसेच भरती झाले तर आर्मीतर्फे खेळविण्यात येणार आहे. नोकरी तसेच खेळण्यासाठी लागणारा डायटचा खर्च आर्मी करणार असल्याचे श्री कदम यांनी सांगितले आहे. तसेच सर्व मुले नेपाळ मध्ये काठमांडू येथील आर्मीच्या होणार्या स्पर्धेसाठी पात्र झाल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील या अभूतपुर्व यशाबद्दल माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन विजयराव कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, पंकज लोढा, साईनिर्माण अॅकेडमीचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते तसेच सर्व शिक्षकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






