दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा – पी एम पाटील

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील तहसील कार्यालयात 3 डिसेंबर जागतिक अपंग दिना निमित्त तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अत्योदय योजने अंतर्गत रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देतांना पाटील सरांनी सांगितले लेकारंजदे गरजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधु ओळखावा देव त्याशी मानावा अनेक दिव्यांग बांधव केंद्र व राज्य शासनाच्या योजने पासून माहिती अभावी वंचित आहे अश्या सर्वांना मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. धरणगाव येथील तहसीलदार नितीन देवरे सो यांनी कोवीडच्या काळात अनेक दिव्यांग बांधवांना अन्नधान्याचे वाटप केलेत गरजूंना,विधवांना,महिलांना मदत केली तीही व्यक्तिक शासनाच्या योजनेचा लाभ तर दिलांच परंतु खऱ्या अर्थाने सेवा भावी काम केले.

धरणगाव तालुक्यात सात हजार दिव्यांग बांधव असून जळगाव जिल्ह्यात 60 हजार दिव्यांग बांधव आहेत.शासनाच्या जी.आर नुसार प्रत्येक ग्रामपंचायत व न.पा.ला 5% निधी उत्पन्नाचा देणे अनिवार्य आहे परंतु अनेक न.पा व ग्रामपंचायती हे टाळाटाळ करीत असतात मा.जिल्हा अधिकारी सो यांनी लक्ष घालून दिव्यांगाचा न्याय हक्क त्यांना मिळवून दयावा भविष्यात टाळाटाळ करणाऱ्या संस्थेच्या विरुधात दिव्यांग बांधव हे रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत.

पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी अनेक दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपा साठी मदत केली परंतु दरवर्षी सर्व दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा नियोजन समिती एक विशिष्ट असा कोठा उपलब्ध करून दिल्यास अधिक दिव्यांग बांधवांना त्यांचा फायदा होईल.तहसीलदार नितीन देवरे,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,तालुका दिव्यांग अध्यक्ष संजय पाटील,दिपिका पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

या प्रसंगी महिला जि.अध्यक्ष सौ.प्रतिभा पाटील,बुलंद पोलीस टाइम्स पत्रकार योगेश पी.पाटील, अक्षय मुथा,राजेंद्र चौधरी,प्रभाकर पाटील,समाधान मोरे,विकास मराठे व अपंग बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here