जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : मेहरुण परिसरात झालेल्या हलल्यात जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपींना अटक करुन एमआईडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलोनीत मेहरुण परिसरात वादातुन चाकुने सपासप वार करुन जख्मी केलेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे रा. रामेश्वर कॉलोनी मेहरुन या तरुणाचा मध्यरात्री उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्हात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, रामेश्वर कॉलनी परिसरात सोळा खोल्या येथे सागर पुनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे रा. सिद्धार्थ नगर रामेश्वर कॉलोनी हे अज्ञात कारणावरुन शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करुन तुमच्या तुमच्या एरियाचा दादा पवन घातक याला बोलव तो साला खूप माजला आहे. त्यालासुद्धा बघतो असे ओरडत होते.
त्यावेळी पवन हा त्याच्या घरात जेवण करत होता. त्याच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे पवन हा सागर आणि विशाल यांच्याकडे येवुन दोघांच्या भांडणात माझे नाव कश्यामुळे घेत आहेत असा जाब विचारल्या पवन आणि त्याच्या कुटुंबियाला सागरला शिवीगाळ केली. यात पवन दोघांच्या अंगावर धावुन गेला आणि तिघांमध्ये हाणामारी झाली.
दरम्यान यात विशाल सपकाळे याने पवनला मागुन पकडुन धरले तर सागर कंडारे याने हातातील चाकुने पवन उर्फ घातक याच्यावर सपासप वार केले. यात पवन गंभीर जख्मी झाला. त्याला शहरातील खासगी रुगणालयात उपचाराथ दाखल केले. रविवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास पवन उर्फ घातकचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पवनभाऊ प्रतिक मुकुंद सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सागर कंडारे आणि विशाल सपकाळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






