साताऱ्यामध्ये आपल्या उद्धारकर्त्यांना वंचितच्या वतीने रक्तदान करून अभिवादन – चंद्रकांत खंडाईत

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : विश्वरत्न बोधीसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीस मानवतेच्या कल्यानकारी मार्गावर नेण्यासाठी तथागतांच्या विचारांचा मार्ग सांगितल्यानेच आज विवीध व्हायरसने सर्व समाज त्रस्त असताना त्यांच्या स्वास्थ्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आसल्यानेच आपल्या उद्धारकर्त्यांना अभिवादन करताना रक्तदान शिबीराचे आयोजन करून अभिवादन करण्यात आल्याची माहीती वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी व त्यांच्या सर्व विंग व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ नपा सातारा यांच्या वतीने अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या सहकार्याने डाँ.बाबासाहेब आबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांना संयुक्तपणे ६ डिसेंबर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजीत करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी १५ महीला व ३५ तरून पुरूषांनी स्वयम प्रेरणेने रक्तदान करून अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदनला रक्तदान शिबीर यशस्वी करन्यासाठी सातारा तालुका अध्यक्ष श्रिरंग वाघमारे,ता.उपाध्यक्ष राजेंद्र सक्टे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे,महासचिव राजेंद्र काकडे,विशाल भोसले,युनियनचे सरचिटणीस अमित चव्हाण,दादासाहेब केंगार,निकाळजे बापू,वसंत गंगावने,गुलाब गंगावने द्राक्षा खंडकर,सौ कल्पना कांबळे,भंडारेताई,शोभा सावंत,रेश्मा सक्टे,ज्योती सक्टे,ईशा सक्टे आदी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करन्यासाठी अथक परीश्रम घेतल्याची माहीती तालुका सचिव वसंत खरात यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here