मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मालाड स्थित डिझायर सोसायटी येथे वैश्विक एड्स प्रतिबंधक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष व्याधीग्रस्त बालिकांसाठी असलेल्या सदर आश्रमास ज्येष्ठ साहित्यिक स्वप्नील राणी नंदकुमार तथा सिनेअभिनेत्री अनुजा लोकूर यांनी विशेष उपस्थिती लावली.
सयोनी तुपे व अनुजा बागेश्र्वर यांच्या मार्गदर्शनाखाली एचआयव्ही बाधित अल्पवयीन तसेच लहान बालिकांनी यावेळी प्रबोधन पर गीते तथा संभाषणे सादर केली तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तिरेखा रेखाटत लहान बालिकानी फॅशन शो सादर केला. १९८८ साली वैश्विक स्वास्थ्य संघटनेद्वारे एड्स व्याधी मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी दर वर्षी १ डिसेंबर हा दिवस एड्स नियंत्रण दिवस असा निर्धारित करण्यात आला असून, एड्स ग्रस्त व्यक्तींना समाजाने स्वीकारण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन स्वप्नील राणी नंदकुमार यांनी याप्रसंगी केले.
समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य म्हणून सर्वांना आभार व्यक्त करण्याचे सकारात्मक कार्य महत्व सिनेअभिनेत्री अनुजा लोकूर यांनी याप्रसंगी अधोरेखित केले. वैश्विक आप्पत्ती कोविड अन नैसर्गिक आपत्ती अवकाळी पर्जन्य या मध्ये देखील सदर कार्यक्रम बालकांनी उत्तमरित्या पर पाडला तसेच यातून त्यांना प्राप्त होणारी सकारात्मकता त्यांच्या द्वारे रेखाटलेल्या चित्रातून प्रगट होत होती.






