साई परिवार सेवाभावी संस्थद्वारा अन्नदान सेवेचे २०१ दिवस संपन्न

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : बहुसंख्येने कोळी बांधव वास्तव्यास असलेल्या कांदिवली परिसरात साई परिवार सेवाभावी संस्थेद्वारा सलग दोनशे एक दिवस अन्नदान उपक्रम राबविण्यात आला होता.


नुकतीच त्याची सांगता करण्यात आली. मंगेश रासम, सौ मनीषा रासम, अनिल वडके यांच्या अथक परिश्रमातून तसेच युवा कार्यकर्ता अंकुश रासम यांच्या मित्रपरिवाराने आर्थिक जबाबदारी उचलत टाळेबंदी तील महत्त्वाचे दिवस अन्नदानाचा यज्ञ सातत्यपूर्ण चालू ठेवला सलग दोनशे एक दिवस अन्नदान करून अनेक कुटुंबीय तसेच नोकरी-व्यवसाय गमावलेले तरुण यांना एक वेळेचा आहार उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य साई परिवार सेवाभावी संस्था द्वारा करण्यात आले याची अनेक खासदार तथा आमदारांनी विशेष दखल घेतली


नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार यांनी दोनशे एक दिवस सांगता सोहळ्यामध्ये विशेष सन्मानपत्र देऊन साई परिवारातील सर्व सदस्यांचा सत्कार केला तसेच विविध केंद्रीय व राज्य लोकप्रतिनिधी द्वारा देण्यात आलेली शुभकामना पत्र यावेळी साई परिवाराला सुपूर्द करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here