पुण्यात दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर कटरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली.




या घटनेत अनिल भगवान अस्मर (वय ३४, रा. पाटे खैरमळा, नारायणगाव, सध्या फिरस्ता) हा गंभीर जखमी झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी शाम नागोराव बनसोडे (वय ३२, रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड, परभणी) याला अटक केली आहे.




पोलीस नाईक सूर्यकांत माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अस्मर हे स्टेशन चौकात थांबले असताना शाम बनसोडे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात शाम याने अनिल याच्यावर धारदार कटरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here