मुंबई (सिद्धार्थ जाधव) – पोलीस बॉईज असोशियशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवि भाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई व ठाणे येथे वाहतुक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवानां सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले सदर सन्मानपत्र सिद्धार्थ डि जाधव (प्रदेशकार्य अध्यक्ष ) धिरज पारसेकर ( निवड समिती अध्यक्ष, मुंबई ) सुशिल मोरे (निवड समिती कार्यअध्यक्ष , मुंबई) अमोल माने ( प्रदेशाध्यक्ष, मुंबई) यांच्या हस्ते देण्यात आले. पोलीस बॉईज असोशियशनचे ( राज्य सरचिटणीस ) विकास रत्नाकर सुसर यांनी या कोविड महामारीच्या काळात लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना पुढिल वाटचालिस शुभेच्छा दिल्या .










