जळगाव (उपसंपादक पी एम पाटील) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दि. १७ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी एस.टी संपाबाबत सांगितले कोणत्याही प्रश्न हा सामोउपचाराने सुटत असतो महाविकास आघाडी सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत असून आपले प्रश्न मार्गी लागतील परंतु आपण जर आपल्या संपावर ठाम राहिले व प्रवासांचे हाल होत असतील तर हे अतिशय चुकीचे आहे. जास्त तानाल तर तुटल्या शिवाय राहत नाही.
या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील सो यांनी सुद्धा एस.टी कर्मचाऱ्यांना आवाहन करून कामावर या योग्य मार्ग निघेल सर्व काही एकाच वेळेस होत नसते. हळूहळू आपले सर्व प्रश्न चर्चेतून सोडविले जातील त्या अनुषंगाने दि. १८ डिसेंबर रोजी अमळनेर जळगाव बस लालपरी धावायला सुरुवात झाली आहे.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी अमळनेर जळगाव बस ड्रायव्हरशी चर्चा करून सांगितले आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यांचा पाळधी येथे पी एम पाटील सर यांनी स्वागत करुन सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा आवाहन केले आहे चर्चेतून सर्व मार्ग निघू शकतात.






