भिवंडीत दुर्गाडी पुलावरून उडी मारून प्रेमी युगुलाचीआत्महत्या

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : भिवंडीतील कोनगाव येथील दुर्गाडी पुलावरून प्रेमी युगुलांने खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली.हे दोघेही दुचाकीने आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह अग्निशमन दल दाखल होत आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत गोडे ( वय २२ रा. कल्याण कोळसेवाडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या युगुलाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.यातरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रशांत हा आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याचे वडील शिक्षक असल्याची माहिती मिळते आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here