नाशिक पोलिसांना केले आणखी ५ जणांना तडीपार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : पोलिसांनी पुन्हा हद्दपारीचे अस्त्र हाती घेतले असून, नुकतेच शहरातील पाच सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहेत.या गुन्हेगारांवर पंचवटी, भद्रकाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार केलेल्यांमध्ये किरण सुखलाल गुंजाळ (वय २३, रा. नवनाथ नगर, पंचवटी), रोहित ज्ञानेश्वर सोळसे (वय २१, रा. भीमवाडी, गंजमाळ), नावेद उर्फ नाना शाफिक शेख (वय २३, रा. गंजमाळ), नागेश चंद्रकांत शेलार (वय ३०, रा. जोशीवाडा, पंचवटी) व जयेश उर्फ जया हिरामण दिवे (वय ३०, रा. इंद्रकुंड, पंचवटी) या पाच गुन्हेगारांचा समावेश आहे.

पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपआयुक्त अमोल तांबे यांच्या आदेशानुसार शहरातील परिमंडळ एकमधील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे जास्त असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर कारवाई प्रस्तावित केली जात आहे. त्यानुसार गुंजाळ, सोळसे, शेख, शेलार व दिवे यांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here