मुलुंडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलावर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा; एकाला अटक

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : मुलुंडमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलासह तीन जणांवर नवघर पोलिसांनी खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. या तिघांपैकी मनोज जाधव या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नगरसेविका केणी यांच्या विभागातील एक काम ऑनलाइन टेंडरमध्ये एका कंत्राटदाराला मिळाले होते. मात्र हे टेंडर मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमिक केणी याने त्या कंत्राटदाराला कार्यालयात बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले, असा नमिक केणी याच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या सहकार्याने कंत्राटदाराला बळजबरीने महापालिकेच्या टी विभागात नेण्यात आले. तेथेच कंत्राटदाराला टेंडर मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणी जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दिवशी नमित यांच्या हळदीचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभ, तर तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी निमितला अटक केली नाही. आता मात्र पोलिस निमितचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here