नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) : प्र क्रं २४ मधील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानामधील विविध समस्यांबाबत आम्ही नविन नाशिक मनपा विभागीय आयुक्त मयुर पाटील यांना निवेदन दिलेले होते.
त्याअनुषंगाने आज विभागीय आयुक्त मयुर पाटील यांनी उद्यानाचा पाहणी दौरा केला व विविध समस्या त्यांना दिसल्या व लवकरात लवकर उद्यानाची साफसफाई व समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केले की, उद्यान हे फक्त मनपाचे नसुन तुमच्याच सोयीसाठी व उपयोगात येणारे आहे तरी सर्वांची जबाबदारी आहे उद्यानाची देखभाल व स्वच्छता ठेवणे. कचरा न करणे. आम्ही दिलेल्या निवेदनाची विभागीय आयुक्त श्री मयुर पाटील यांनी दखल घेतल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी देखील धन्यवाद मानले.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानाची मनपा विभागीय आयुक्त मयुर पाटील यांच्याकडून पाहणी






