रा. ला. न.प. माध्यमिक कन्या शाळेची आयटीआय कारंजा येथे शैक्षणिक भेट .

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : आर एल नगरपरिषद माध्यमिक कन्या शाळा कारंजा येथे शासनाच्या एन एस क्यू एफ व सामग्री शिक्षा अभियान अंतर्गत ब्युटी अँड वेलनेस हा विषय वर्ग ९ वी व १० वी करिता शिकविण्यात आला


यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. खेमवाणी तसेच सागर कडलग, समन्वयक व्ही एल सी सी हेल्थ केयर लिमिटेड यांचे मार्गदर्शनात ब्युटी अँड वेलनेस विभागाच्या प्रमुख कु. वंदना कांबळे यांनी पन्नास विद्यार्थिनी सह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथे भेट दिली


या भेटी दरम्यान आयटीआय येथील बेसिक कॉस्मेटोलॉजी विषयाच्या शिक्षिका सौ गायगोळे मॅडम यांनी विद्यार्थिनींना व्यवसाय अभ्यासक्रमा विषयी मार्गदर्शन केले तसेच अभ्यासक्रमा नंतर रोजगाराच्या असणाऱ्या विषयाच्या संधीबाबत माहिती देऊन अवगत केले. भेटीदरम्यान अभ्यासक्रमा संदर्भात असणाऱ्या विषयाचे प्रत्यक्षित देखील विद्यार्थिनी कडून घेण्यात आले औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथील प्राध्यापक श्री चांदेकर तथा कीर्ती मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले शैक्षणिक भेटीकरिता श्री जाधव, सौ गावंडे, श्री जनबंधू यांनी सहकार्य केले कु. वंदना कांबळे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा यांचे आभार व्यक्त केले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here