आज आढळले ५२८ कोरोनाबाधित; सर्वाधिक कोरोनाबाधित जळगाव शहरात
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्या दिवशी पाचशे रुग्णसंख्येचा आकडा गाठला असून आता जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने 15 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. आज (दि.११) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर 375 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 असा समावेश आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा समावेश असल्याची माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







