जळगांव (संपादक सुनिल पाटील) – भारतीय जनता पार्टी नुतन जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद भाऊ वाणी व उत्तर महाराष्ट्र प्रमुख गजेंद्र भाऊ सोनवणे व उत्तर महाराष्ट्र सह प्रमुख पंकज भाऊ पाटील यांनी राजु मामा यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात धुळे, नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शहरी व ग्रामीण भागातील 8 ते 12 महिन्याचे थकित वेतन लवकरात लवकर मिळण्या बाबत आरोग्य मंत्री ना. राजेश टोपेंसोबत बोलत असतांना काही तांत्रिक बिघाडामुळे बोलने पूर्णपणे झाले नाही. पुढे मामांनी सांगितले मी लवकरात लवकर जातीने लक्ष देवुन चर्चा करतो. व थकित वेतन लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. चर्चा करतांना राजु मामांनी सांगितले आहे. लवकरात लवकर इतरत्र सुरक्षा रक्षकांच्या सर्व समस्या सोडवल्याजातील.असे विश्वास पुर्ण आश्वासन देण्यात आले आहे. या वेळी उपस्थीत मा.श्री.आत्माराम काका माळके माजी तालुका अध्यक्ष चोपडा ग्रामीण गजेन्द जैसवाल शहर अध्यक्ष चोपडा भाजप घुमावल माजी सरपंच प्रकाश पाटील हंनुमत तात्या उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांना निवेदन







