सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून समाजाचा तारणहार म्हणून अनिल वीर कार्यरत आहेत. सर्वगुणसंपन्नता असूनही राजकारण विरहित पत्रकार म्हणून चौथ्या खांबाचे प्रतिरूप, स्वच्छ व शुध्द कार्य करीत आहेत. फास्ट न्यूजही बीबीसीच्या तोडीच्या देत आहेत बातम्या अभ्यासपूर्ण असतात.बिनधास्त व डाॅशिंग व्यक्तीमत्त्व असणारे सर्वसमाजघटकांना न्याय देत आहेत.अशी प्रतिक्रिया बंधुत्व प्रतिष्ठान पुरस्कार विजेते दयानंद जगताप (काका) यांनी दिली.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल वीर यांची निवड झाल्याने सर्व प्रसारमाध्यमाच्या सहाय्याने अभिनंदनाचा गौरवशाली प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात, विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत. विस्ताराधिकारीअशोक भालेराव म्हणाले, “सामाजिक सुधारणा कार्यक्रमात सातत्याने पाठपुरावा करणारे वीरसर आहेत. वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्यांचे अचूक वृत्तांकन करणारे व समाजहितासाठी अहोरात्र झटणारे म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.”
सातत्याने थेट मागणी करणारे डॉ. गोरख बनसोडे म्हणाले,”आपण आपले वर्तमानपत्र का काढीत नाही ?” याबाबत,समाजाचे स्वतंत्र असे व्यासपीठ आपल्याच माध्यमातून निर्माण होईल. असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रा.रमेश मस्के म्हणाले, “आतापर्यंत आपण दिलेले योगदान हे आपला माणूस म्हणून अप्रूप आहेच.यापुढेआपल्या लेखनीची धार अधिक तेजोमय व्होवो.” डॉ.कुलदीप यादव म्हणाले, “विकासात्मक सामाजिक सुधारणा आणि वैचारीक मांडणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने वाटचाल करत आहात.आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक जाणिव आणि बातम्यांचे अचूक वृत्तांकन करीत आहात. समाजहितासाठी अहोरात्र झटणारे अशीच प्रतिमा आहे.”
सीताराम सपकाळ म्हणाले, “आपल्या लेखणीची महत्ती, शब्दांची सजावट व विचारांची प्रगल्भता अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. केवळ शहरातील बातम्या न देता खेड्यापाड्यातील सर्व गोष्टींचा उलगडा जाहीर करीत असल्याने न्याय मिळण्यास मदत होते. फुले- शाहू-आंबेडकर चळवळीचा वारसा आपण मोठ्या दिमाखात चालवतायं. वंचित बहुजनांचे प्रश्न तुम्ही पोटतिडकीने मांडत आहात. तुमचं योगदान आंबेडकरी चळवळीमध्ये मोलाचं असून तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.माझ्यासारख्या पामराकडे शब्द नाहीत.” भीमराव दाभाडे म्हणाले,”आपली लेखणी ही डॉ, बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील एक लाखात देखणी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.आपण दिलेले योगदान महत्वाचे ठरले आहे. आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, धार्मिक व राजकीय प्रचार-प्रसार आपल्या माध्यमातून होत आहे.” प्रकाश अवचार, सुनील माने व पिराजी सातपुते म्हणाले, “झटपट आणि पटपट बातम्यांचे अचूक वृत्तांकन करणारे व समाजहितैषी कार्यातील अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्व होय.”
अनिल वीर यांचा सत्कार करताना प्रा.माणिक आढाव व बी.एल.माने यांनी केला.यावेळी भन्ते दिंपकरजी, नंदकुमार काळे,गौतम भोसले,सी. जगताप,डॉ.ननावरे,रमेश गायकवाड,संतोष मोरे, महादेव मोरे आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील,डॉ.संजय सरगडे, मधुकर काळे,राजकुमार बनसोडे, अक्षय ननावरे,विश्वास जगताप, पर्यवेक्षक अनिल कांबळे (नाडे), अनिल कांबळे(कोरेगाव), एकनाथ रोकडे, ऍड.हौसेराव धुमाळ, छाया बनसोडे,चित्राताई गायकवाड,ता.का.सूर्यवंशी,राहुल रोकडे ,रणजित कांबळे,प्रदीप मस्के,संकेत मस्के,निवृत्ती रोकडे, राज भंडारे,ऍड.सचिन पाटील (डावरी),अनिल भालेराव,दीपक गाडे,विठ्ठल यादव,खरात फॅमिली (भिलार-पाचगणी),मिलिंद जाधव, संतोष जाधव,सचिन कांबळे,वाय.आर.केंडे,शंकर गावडे,सी.के.बल्लाळ,दयानंद शिलवंत,राजेंद्र सत्वधीर,अनिल मोहिते,संजय जाधव,राजेंद्र भंडारे,आबासाहेब भंडारे,गौतम माने,एस.गायकवाड,अनिल जाधव,कैलास चव्हाण,सार्थक मगर,महेंद्र वीर,प्रवीण वीर, मंगेश कांबळे,लक्ष्मण मगर, राजेंद्र,मारुलकर,के.प्रभाकर (चिपळूण),मुख्याध्यापक कांबळे (कोल्हापूर),ता.का.सूर्यवंशी, शिवाजी खामकर,भागवत देसाई,शंकर गावडे,भागवत देसाई,मारुती मोरे, प्रभाकर बनसोडे, मारुती आढाव,सुधाकर काकडे,प्रा.रमेश मस्के,प्राचार्य कांबळे,गणेश गव्हाळे,डॉ. अरुण गाडे,पिराजी सातपुते,आई ज्वेलर्स परिवार,पो.पाटील तथा पत्रकार रोकडे,प्रकाश काशीळकर, अक्षय कांबळे,रवींद्र फणसे,प्रवीण वीर,राजू घोलप आदी असंख्य मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.






